Click here to switch to English version.

नमस्कार मंडळी,

आपण ज्याची बऱ्याच दिवसापासून वाट पहात होतो, तो उन्हाळा सुरु झालाय. मुलं शाळेच्या व्यस्त दिनक्रमातून मुक्त झाली आहेत. आता उन्हाळी-शिबिरं, barbeque पार्ट्या, आणि सहलींची वेळ आहे. आपण इथल्या ऋतूंचा आनंद घेत असतो तेव्हा आपलं मन मात्र भारतात असतं; आत्ता पुण्यात खूप पाऊस पडत असेल, मुंबईत पूर-परिस्थिती निर्माण झाली असेल, नागपुरात तीव्र उन्हाळ्यापासून सुटका झाली असेल, इत्यादी... ही नरीमन पोइंटवर हातात-हात घालून पावसात भिजत भटकायची वेळ आहे. घर-कोंबड्यांना मित्रांबरोबर कांदा-भजी खात, टी-व्ही बघत घरातच बसायला चांगला बहाणा मिळतो. तुम्ही कुठे असता किंवा काय करता त्याला महत्व नाही, पण ही वेळ ताण-तणावाच्या वातावरणातून बाहेर पडून मित्र व कुटुंबासह मजा करून पुन्हा जोमाने कामाला लागायची असते.

DVMMM सभासदांचे (व सभासद नसलेल्यांचेही) सहली साठी सहर्ष स्वागत करीत आहे. ही सहल आपली भेळ-पुरी, गोटी-सोडा किंवा बर्फाचा-गोळा याची तल्लफ भागवेल का? गल्ली-क्रिकेट किंवा लगोरी खेळता येईल का? अशासारख्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचं नियोजन सुरु आहे. ह्या दिवसाच्या सुंदर आठवणी तुमच्या मनात रेंगाळत राहतील, ह्याची मात्र खात्री देतो.

तर आता कंबर-कसून आपापली खेळाची सामग्री, sun-screen इत्यादी वस्तू एकत्र करून सहलीच्या तयारीला लागा.

कृपया खालील माहितीची नोंद घ्या:

सहलीचे ठिकाण: बेल्लेव्यू स्टेट पार्क, विल्मिंगटन, डेलावेयर (आइ-९५ ला लागून)

तारीख आणि वेळ:२४-जुलै (त्या दिवशी पाऊस असल्यास ३१-जुलै), २०१०. सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:००

सहलीसाठी वर्गणी:

RSVP सकट सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे)

$६.००

RSVP सकट बाल सदस्याचे दर (५ ते ११ वर्ष)

$४.००

RSVP शिवाय सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे)

$८.००

RSVP सकट गैर-सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे)

$८.००

RSVP शिवाय गैर-सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे)

$१०.००

बाल सदस्याचे दर (५ वर्ष पेक्षा लहान)

विनामूल्य


RSVP करण्यासाठी येथे क्लिक करा.