To view in English click here.

नमस्कार मंडळी!,

महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना श्री. श्रीधर फडके यांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नको आहे. गुणगुणावीशी वाटणारी असंख्य सुमधुर मराठी गाणी देणारे ते एक प्रख्यात संगीत दिग्दर्शक आणि गायक आहेत. 'तेजोमय नादब्रह्म', 'ऋतु हिरवा', 'ओंकार स्वरूपा', 'मनाचे श्लोक' हे या संगीतकार-गायकाचे काही प्रसिद्ध अल्बम्स! कै. सुधीर फडके यांच्या या कर्तुत्ववान समर्थ सुपुत्राने संगीत एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले आहेत.

DVMMM आणि श्री. मयूर देवल, श्री. श्रीधर फडके यांच्या 'फिटे अंधाराचे जाळे' या सुमधुर संगीत-संध्येचे आपणास सस्नेह आमंत्रण देत आहेत. ही संगीत-संध्या मातृदिनीदिवशी (Mother's Day) आहे. समोरासमोर बसून श्री. श्रीधर फडके यांची मैफल ऐकण्याइतके चांगले gift आईसाठी दुसरे कोणते असू शकेल?

५ वर्षे व त्या वरील मुलांना सांभाळण्याची DVMMM ने खास सोय केली आहे.

तरी त्वरा करा! आपली प्रवेशिका लवकर खरेदी करा. कारण प्रवेशिका मर्यादित आहेत आणि "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य" तत्वावर उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाचा तपशील:

स्थळ: Delware Hindu Temple, Wedding Hall. 760 Yorklyn Road, Hockessin, DE, 19707. नकाशा पहा.

तारीख व वेळ: ९-मे २०१० रोजी दुपारी ३:०० ते ६:००

संगीत संध्या प्रवेशिका दर:

आगाऊ आरक्षण
व्ही.आई.पी $२५.००
सर्व सामान्य $२०.००
मुलांची काळजी घेणे $५.०० (कार्यक्रमावेळी प्रती मुल)
Online विकत घ्या उपलब्ध नाही! आगाऊ आरक्षण समाप्त. कृपया कार्यक्रमाच्या वेळी तिकिटे खरेदी करा. आगाऊ आरक्षण समाप्त. कृपया कार्यक्रमाच्या वेळी तिकिटे खरेदी करा.
चेक पाठवा चेक DVMMM च्या नावे P.O. Box 1051, Hockessin, DE 19707 वर पाठवावा. आमच्याकडे तुमचे चेक १-मे पर्यंत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. आपला email address आम्हाला कळवावा म्हणजे आम्हाला आपल्या चेक ची पोच उशीरात-उशीरा ५-मे पर्यंत पाठवता येईल. email द्वारा दिलेली पोच-पावती कार्यक्रमाच्या वेळी सोबत आणावी. पोच पावती नसल्यास आगाऊ आरक्षणाचे दर लागू होणार नाहीत. टपाल खात्याकडून चेक न मिळाल्यास किवा विलंब झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.


कार्यक्रमाच्या वेळी खरेदी केल्या जाणाऱ्या प्रवेशिकांचे दर:
व्ही.आई.पी. $३०.०० सर्व सामान्य $२५.०० मुलांची काळजी घेणे $६.०० (कार्यक्रमावेळी प्रती मुल)